- वेकोलिची कोळसा वाहतूक शेतकऱ्यांनी तब्बल पाच तास रोखली
- ओव्हरलोड कोळसा वाहतुकीने रस्त्याची दुरवस्था
- धुळीने पिके काळवंडली ; शेतीला फटका
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
बल्लारपूर वेकोली अंतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील कोळसा खदानीतून होणाऱ्या अवजड वाहतुकीने रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णतः.काळवंडली आहे. गोवरी पोवनी मुख्य मार्गावर रस्त्यावर पाणी मारण्याचे व ओव्हरलोड कोळसा वाहतूक करणार नाही, असे लेखी आश्वासन दिले. मात्र वेकोलीला त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे गोवरी येथील शेतकऱ्यांनी रविवारी सकाळी ९ वाजता पासून वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली
राजुरा तालुक्यातील गोवरीपोवनी मार्गावर प्रचंड प्रमाणात ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरू असते.त्यामुळे रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. कोळसा वाहतूक ओव्हरलोड असल्यामुळे या मार्गावर धुळीचे साम्राज्य वाढलेले आहे. त्यामुळे रस्त्यालगत असणारी पिके पूर्णतः काळवंडली असल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. सोबतच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ताडपत्री न झाकता वाहतूक सुरू असल्यामुळे धावत्या वाहनातून कोळशाचे तुकडे रस्त्यावर पडतात त्यामुळे प्रवाशांच्या जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे गोवरी येथील शेतकरी प्रज्योत चिडे, बंडु मशारकर, नानाजी दरेकर, मंगेश दरेकर, रामदास देवाळकर, शुभम खवसे, करण मशारकर, लहू दरेकर, प्रफुल्ल दरेकर, रुद्राकर दरेकर, झिबला बोबडे व गावकऱ्यांनी वेकोलीची कोळसा वाहतूक रोखून धरली. टँकरने रस्त्यावर पाणी मारल्यानंतर कोळसा वाहतूक पूर्ववत करण्यात आली.गोवरीपोवनी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांना चांगल्या रस्त्याची प्रतीक्षा........
वेकोलीतून होणारी ओव्हरलोड कोळसा वाहतूक जीवघेणी आहे.अनेकदा ओव्हरलोड वाहतूक बंद करण्याचे लेखी आश्वासन वेकोली अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना दिले आहे. मात्र ओव्हरलोड कोळसा वाहतूक सुरूच आहे. त्यामुळे वेकोलीच्या मुजोर प्रशासनावर अंकुश कोण लावणार ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.