- नाट्यगृहाला "गोंडराजे बल्लारशाह" यांचं नाव
- नाट्यगृहला गोंडराजे बल्लाळशाह यांच्या नावाने नामकरण करताना बल्लारपूर शहराचा ऐतिहासिक पार्श्वभूमी नावलौकिक केल्याचा आनंद - हरीश शर्मा
घनश्याम बुरडकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
दिनांक 01 जानेवारी 2022 नव्या वर्षाची नवी पहाट ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या बल्लारपूर शहराकरिता मानाची ठरली. माजी, अर्थ नियोजन व वन मंत्री विकास पुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या भव्य अशा नाट्यगृहला ऐतिहासिक पार्श्वभूमी व राजेशाहीने गाजलेल्या, राजधानी म्हणून नावारूपास आलेल्या या राजधानीचे गोंडराजे बल्लाळशाह यांच्या नावाने नामकरण वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. तसेच यावेळी नगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे धनादेश वितरीत करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी संबोधित करताना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या शहरातील नाट्यगृहला गोंडराजे बल्लाळशाह या नावाने नामकरण करताना अत्यानंद होत आहे. परंतु संभाव्य कोरोणाच्या तिसऱ्या लाटेच्या कारणाने मोठेखानी कार्यक्रम करणे शक्य झाले नाही अशी खंत यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी नगरपालिकेचे उपाध्यक्ष सौ. मीनाताई चौधरी, मुख्याधिकारी विजय सरनाईक साहेब, नगरसेवक शिवचंद द्विवेदी, पाणी पुरवठा सभापती कमलेश शुक्ला, सौ.जयश्रीताई मोहुर्ले, सौ पुनमताई मोडक, सौ.आशाताई संगीडवार, महिला व बालकल्याण सभापती सौ. अम्कुबाई भुक्या, माजी नगराध्यक्ष सौ.छायाताई मडावी तसेच काशीनाथ सिंह, मेघनाथ सिंग, मनीष पांडे, देवेंद्र वाटकर, किशोर मोहुर्ले, चरनदास शेडमाके, संतोष आत्राम, श्रीमती मिनाक्षी गेडाम, श्रीमती तानाबाई मेश्राम, शंकर मडावी व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.