Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री शिवाजी महाविद्यालयात कॅन्सर जनजागृती शिबिर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्री शिवाजी महाविद्यालयात कॅन्सर जनजागृती शिबिर आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा...
  • श्री शिवाजी महाविद्यालयात कॅन्सर जनजागृती शिबिर
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथक, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग आणि स्टॉप कॅन्सर मिशनच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून स्टॉप कॅन्सर मिशनचे समन्वयक अजय ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. कॅन्सर होण्याचे कारणे, कॅन्सर होऊ नये यासाठी उपाययोजना आणि झाला तर काय केले पाहिजे. यासोबतच कॅन्सर ची भीती न बाळगता निदान झाले तर लवकरात लवकर उपचार सुरू करावे असेही यावेळी सांगितले. 
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी वारकड तसेच प्रमुख उपस्थिती IQAC समन्वयक डॉ. मल्लेश रेड्डी, शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक डांगे उपस्थित होते. तसेच आयोजक शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ रायपुरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा इतिहास विभाग प्रमुख प्रा. गुरुदास बलकी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संचालन डॉ आनंद रायपुरे यांनी तर आभार प्रा. गुरुदास बलकी यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top