Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामूहिक मकरसंक्रात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामूहिक मकरसंक्रात साजरी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - औद्योगिक शहर गडचांदूर येथील गोरे ले आउट वार्ड क्रमांक 3 येथे सामू...
  • सामूहिक मकरसंक्रात साजरी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
औद्योगिक शहर गडचांदूर येथील गोरे ले आउट वार्ड क्रमांक 3 येथे सामूहिक मकर संक्रात नुकतीच साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा मध्ये जुन्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. सांसारिक प्रपंच चालवायला ज्या ज्या वस्तू गरजेच्या असतात त्या सर्व वस्तूने पंडाल सजविण्यात आले, दगडी जात्या पासून तर दगडी खळा पर्यंत विविध वस्तू ठेवण्यात आल्या. लहान मुलींनी सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली त्यात त्यांनी नृत्य व नाटकाचे सादरीकरण केले.
स्त्रिया पारंपारिक वस्त्र परिधान करून वाण वस्तुंचे आदान प्रदान केलेत. कार्यक्रमाचे संचालन सौ. कल्पना खरवडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार करण्या साठी सौ. रुपाली खामनकर, सौ. वैशाली गोरे, सौ. रक्षणदा खामनकर, सौ. प्रियंका गोरे व इत्यादी स्त्रियांनी मदत केली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top