विरेंद्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा -
कुत्रा आणि मानव यांच्यातील प्रेम पाहण्यासाठी एक ठिकाण म्हणजे डॉग शो इव्हेंट. गेल्या दोन वर्षांपासून असाच कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी आयोजित करण्यात आला असून 38 जातीच्या 200 हून अधिक कुत्र्यांनी सहभाग घेतला. सम्राट लॉन आतील मैदानात हा डॉग शो पार पडला. या शोमध्ये त्यांच्या मालकांसह 200 कुत्रे सहभागी झाले होते. तसेच रेबीज कॅम्प घेण्यात आला होता त्यात भारतीय जातीच्या 20 कुत्र्यांना रेबीज चे मोफत लसीकरण करण्यात आले. रेबीज कॅम्प चे आयोजक राजुरा सिटी कॅनिन क्लब व प्यार फोउनक्स राजुरा होते.
सम्राट स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष मनोहर आईटलावर यांनी सांगितले कि, "या शोचा उद्देश श्वानप्रेमी आणि पाळीव प्राणी मालकांना एकत्र आणण्याचा आहे."
नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, विजयवाडा, वरंगल, बडणेर, काटोल, रायपूर इत्यादी शहरातून कुत्र्यांनी व श्वानप्रेमींनी हजेरी लावली त्यात अफगाण हाउंड, सायबेरियन हस्की, न्यूफाउंडलँड लॅब्राडोर, ल्हासा अप्सो, डॉबरमन, चिहुआहुआ, जर्मन शेफर्ड, रॉटवेलर, डॅशचुंड, ग्रेट डेन, कॉकर स्पॅनियल आदी जातीच्या जाती सहभागी झाल्या होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणू माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सेठ राधेश्याम अडानिया, अभिजित धोटे, रत्नमाला बदकमवार उपस्थित होते. परीक्षक डॉ. हिमांशू व्यास हे होते.
कुत्र्यांना सर्वात आज्ञाधारक, सुव्यवस्थित महाकाय जाती, उत्तम पोशाख इत्यादी विविध पदव्यांची स्पर्धा करावी लागली. शोचा राजा हा किताब जिंकणाऱ्या रायपूर पाहिले पदक जर्मनशेपरड जातीचा विजेता होता, तर नागपूर हुन पग जातीचा शोच्या दुसरे पदक आणि नागपूर हुनच डाबरम्यान ह्याने तिसरे पदक पटकावला होता, असे या शोचे सचिव वैभव आईटलावर यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.