Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रेतीचोरीसाठी विना नंबर ट्रॅक्टर व ट्राँलीचा वापर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेतीचोरीसाठी विना नंबर ट्रॅक्टर व ट्राँलीचा वापर मुजोर रेतीचोराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल चोरीत वापरलेल्या ट्रॅक्टरचा पोलिस घेत आहे श...
  • रेतीचोरीसाठी विना नंबर ट्रॅक्टर व ट्राँलीचा वापर
  • मुजोर रेतीचोराविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
  • चोरीत वापरलेल्या ट्रॅक्टरचा पोलिस घेत आहे शाेध
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
काल शुक्रवार दि. २१ जानेवारीला काेरपना तालुक्यातील भागातील अतिदुर्गम म्हणून ओडाखल्या जाणाऱ्या काेडशी (बु.) येथील पैनगंगा नदीच्या पात्रातुन पहाटेला एक ट्रॅक्टर अवैधरित्या रेती नेत असताना गावातील पाेलिस पाटील पांडुरंग जरीले, उपसरपंच बंडु नामदेव वासेकर व गावातील काही नागरिकांनी अडवले. परंतु ट्रॅक्टर चालक ने उपरोक्त मंडळी सोबत अरेरावी सुरू केली. त्यांच्या विरोधाला न जुमानता ट्रॅक्टर चालकाने आपले रेतीने भरलेले वाहन त्याला रोकण्याचा प्रयत्न करीत असलेल्या लोकांच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्यांचा प्रयत्न केले आणि तिथून ट्रॅक्टर सहित पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. 
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी या अवैध रेती नेत असलेल्या ट्रॅक्टरची माहिती काेरपना मंडळाचे मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांना सांगताच ते पटवारी दिलीप देठे व काेतवालासह घटनास्थळी दाखल झाले. गावकऱ्यांचे असंतोष व परिस्थितीचे गांभीर्य बघत त्यांनी लगेच या घटनेची सविस्तर माहिती तहसीलदार महेन्द्र वाकलेकर यांना दिली. सदर कोडशी नदीपात्राला प्रत्यक्ष पाहणी करून आलेल्या मंडळ अधिकारी राजेन्द्र पचारे यांनी सांगितले की जेसीबीच्या सहाय्याने घाट खोदून राजुरकर यांच्या वावरातून अवैध रित्या रस्ता बनवून प्रदीप सीताराम कुडमेथे यांनी पन्नास ते साठ ब्रास रेती वाहनाने नेली असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे मत व्यक्त केले. त्या मुजाेर रेती तस्कराच्या विराेधात पाेलिस स्टेशन काेरपनाला पाेलिस पाटील पांडुरंग जरीले यांनी रिपोर्ट दिली आहे. पाेलिसानी गुन्हा दाखल करून या मुजाेर अवैध रेती तस्कराचा आणि चोरीत वापरलेल्या ट्रॅक्टरचा शाेध घेत आहे. रात्रीला ट्रॅक्टर ने माेठ्या प्रमाणात रेती चाेरुन नेत असल्याची कबुली पोलिस पाटलासह अनेक गावकऱ्यांनी याची कबुली दिली आहे. गावातील सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील यांनी तहसील प्रशासना आणि पोलिस प्रशासनाला अवैधरेतीची तस्करीवर आळा घालण्याची मागणी केली आहे. आता या मुजाेर रेती तस्करावर तहसील विभाग नेमकी कोणती कठोर कारवाई करणार याकडे कोडशी सोबतच संपूर्ण काेरपना वासियांचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे या मुजाेर रेती तस्कराच्या ट्रॅक्टर व ट्राँली ला कुठल्याही प्रकारचा नंबर नसल्याची ही माहिती मिळाली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top