- रामपूर ग्राम पंचायत उपसरपंच निवडीवर आक्षेप
- अधिकाराचा दुरुपयोग करीत बहुमत नसताना केले विजयी घोषित
- जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली लेखी तक्रार
- शिवसेना-काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषद
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
दि. 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पार पडलेल्या रामपूर ग्रामपंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अध्याशी अधिकारी आर.एन. चून्ने व सभेचे अध्यक्षा सरपंच वंदना गौरकार यांनी मनमानीने कारभार चालवून बहुमत नसताना, अधिकाराचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया घेऊन सदस्यांची फसवणूक केल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणाची लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
शिवसेना-काँग्रेसच्या ग्राम पंचायत सदस्यांच्या म्हणण्यानुसार उपसरपंच पदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेता येणे आवश्यक होते. परंतु अध्यासी अधिकारी व सरपंच यांनी सदस्यांचे म्हणणे ऐकून न घेता गुप्त मतदान पद्धत स्वतःच्या मर्जीने घेण्याचे ठरविले तसेच सभेमध्ये ग्रामपंचायत सदस्यांना आपले कोणतेही मत मांडण्यास मनाई करण्यात आली होती आणि उपसरपंच पदाची निवडणूक ही पूर्णपणे बेकायदेशीर तरतुदीच्या विसंगत घेतलेली असून सदस्यांवर अन्याय करणारी आहे. त्यामुळे सदर निवडणूक रद्द करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत सरपंच यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून निवडणूक कार्यक्रम स्वतःच्या इच्छेप्रमाणे अध्यासी अधिकारी यांच्यामार्फत राबविण्यात आला असून तो पूर्णपणे चुकीचा आहे व कायद्याच्या विसंगत आहे त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व अध्यासी अधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे पालन न करता निवडणूक कार्यक्रम चुकीच्या पद्धतीने पार पाडून ग्रामपंचायत सदस्यांवर अन्याय केला त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली असता तहसील कार्यालय राजुरा येथून निवडणूक प्रक्रियेची सत्यप्रत घेतल्यानंतर विजयी उमेदवाराला मिळालेली 3 मत अवैध असून एकूण 5 पैकी 2 मत वैध होते. त्यातच विरोधी उमेदवाराला 6 मत असताना सुद्धा 1 मत अवैध ठरवून राजकीय दबावातून 5 मतांनी उपसरपंच्याची निवड करण्यात आली ही निवडणूक फिक्स होती याचा निषेध आणि फेरनिवडणूक व्हावी या मागणीसाठी आज दि. 22 जानेवारी ला शिवसेना जनसंपर्क कार्यालय नाका नंबर 3 येथे शिवसेना-काँग्रेस यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तिथे उपस्थित शिवसेना-काँग्रेसच्या ग्रापं सदस्यांनी ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेला शिवसेनेचे राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, शिवसेना राजुरा तालुका प्रमुख वासुदेव चापले, गोवरी येथील सरपंच आशा उरकुडे, ग्राम पंचायत सदस्य अनिता आडे, लक्ष्मी चौधरी, जगदीश बुटले, रमेश झाडे, संगीता विधाते, लता डकरे, प्रदीप येनुगकर, अजय सकीनाला, बंटी मालेकर, राजू काटम, सिनू कारंगला, प्रदीप येनूरकर यांची उपस्थिती होती. मागणी पूर्ण न झाल्यास चक्काजाम व तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.