Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: इन्फंट कान्व्हेंट च्या विद्यार्थिनींची आयआयटी मुंबई येथे निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
इन्फंट कान्व्हेंट च्या विद्यार्थिनींची आयआयटी मुंबई येथे निवड राईस अँकाडमीच्या वतीने कोमल मिना चा सत्कार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजु...
  • इन्फंट कान्व्हेंट च्या विद्यार्थिनींची आयआयटी मुंबई येथे निवड
  • राईस अँकाडमीच्या वतीने कोमल मिना चा सत्कार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे सत्र २०१८- २०१९ मधील माजी विध्यार्थीनी कु. कोमल रामसिंग मीना हिने जेईई मेन्स अँड अडवान्स या दोन्ही परिक्षेत नेत्रदीपक कामगिरी करून आयआयटी मुंबई येथे आपले स्थान पक्के केले आहे. इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेतही तीने 99.40% गुण प्राप्त केले आहेत हे विशेष. 
तिच्या या यशाबद्दल कु कोमल मीना हिला इन्फंट जिजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित राईस अॅकाडमी च्या वतीने शाल श्रीफळ व ११ हजार रुपये रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. राईस अॅकाडमी ही राजुरा आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी जेईई आणि निट परिक्षेची तयारी करण्यासाठी प्रदक्षिण देण्याचे काम करते. आज राईस अॅकाडमी च्या विद्यार्थ्यांना कोमल मीना हिने मार्गदर्शन केले. आपल्या यशाचे रहस्य समजावून सांगितले. यशस्वी होण्यासाठी आवश्यक टिप्स सांगितल्या. 
या प्रसंगी संस्थेचे सचिव अरुण धोटे, संस्थेचे संचालक अभिजित धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, रामसिंग मिना सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top