Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर येथे एआयएमआयएमची कार्यकारिणी गठीत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदूर येथे एआयएमआयएमची कार्यकारिणी गठीत तालुका अध्यक्ष मो. रफिक शेख तर शहर अध्यक्ष म्हणून शेख मुननू शेख शरीफ यांची नियुक्ती धनराजसिंह शेख...
  • गडचांदूर येथे एआयएमआयएमची कार्यकारिणी गठीत
  • तालुका अध्यक्ष मो. रफिक शेख तर शहर अध्यक्ष म्हणून शेख मुननू शेख शरीफ यांची नियुक्ती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन या राजकीय पक्षाची नवनियुक्त कार्यकारणी अमलनाला विश्रामगृहात गठीत करण्यात आली. मजलिस चे प्रमुख खासदार बॅरिस्टर असद्दुद्दिन ओवैसी यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचे विचार घराघरात पोहचवण्यासाठी व राज्याचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकाराने व राज्य प्रवक्ता व चंद्रपूर जिल्हा प्रभारी प्रा. जावेद पाशा याच्या मार्गदर्शनाने चंद्रपुर जिल्हाध्यक्ष नाहीद हुसैन यांचे अध्यक्षतेखाली स्थानिक अमलनाला विश्रामगृहात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन कार्यकारणीचे गठित करण्यात आले. या प्रसंगी चंद्रपूर कार्यकारणीचे महासचिव मौलाना साजिद अन्सारी, सोहेल मिजवाही, मीडिया प्रभारी अजगर, अनिस कुरेशी, सैययद असिफ, शेख अतिक शेख, शेख साकीब प्रमुख्याने हजर होते.
यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करत पक्षाचे ध्येयधोरण समजावून सांगितले. हमारा काम ही हमारी पहचान या प्रमाणे जनतेच्या कामासाठी झटण्याचे आवाहन जिलाध्यक्ष नाहिद हुसैन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. यानंतर सर्व संमतीने तालुका अध्यक्ष म्हणून मो. रफिक शेख यांची तर गडचांदूर शहर अध्यक्ष म्हणून शेख मुननू शेख शरीफ, उपाध्यक्ष शेख रऊफ मो. शरीफ, सचिव शेख दस्तगीर शेख रज्जाक, मीडिया प्रमुख शेख इबबू शेख कादर यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी रफिक निझमी, राजू कादरी, अनिस कुरेशी, मौलाना अकबर साहेब, पत्रकार नासीर खान, शेख कादर, मो.फैज शेख, हाजी शब्बीर ढाकवाला, शोएब जीलानी, माझी नगरसेवक अब्दुल हफिज, तीलक पाटील सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. संचालन, प्रस्तावना व आभार रफिक शेख यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top