Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विरूर पोलीस स्टेशन येथे निःशुल्क रोगनिदान शिबीराचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विरूर पोलीस स्टेशन येथे मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन 1015 नागरिकांनी केली आरोग्य तपासणी  अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन...
  • विरूर पोलीस स्टेशन येथे मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
  • 1015 नागरिकांनी केली आरोग्य तपासणी 
अविनाश रामटेके - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन - 
ग्रामीण भागातील गोरगरिबांना त्यांच्या रोगाचे निदान व्हावे व त्यांना वेळीच उपचार होऊन त्यांचा आर्थिक भार कमी व्हावा तसेच स्त्रियांचे व बालकांचे आरोग्य सुधारून जीवनमान उंचावेल या उध्दात हेतूने पोलीस स्टेशन विरुर व उप पोलीस स्टेशन लाठी यांच्या संयुक्त विद्यमाने विरुर पोलीस ठाण्याच्या प्रांगणात भव्य असा मोफत रोगनिदान शिबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमूख अतिथी म्हणून अतुल कुलकर्णी अप्पर 
पोलीस अधिक्षक चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित दर्शवित त्यांनी यावेळी पोलीस पूर्व भरती प्रशिक्षण ग्राउंड चे उदघाटन करून ठाण्यात यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले ,यावेळी उपस्थित जनतेला व विद्यार्थ्यांना आरोग्या विषयी योग्य मार्गदर्शन  करण्यात आले 
रोगनिदान शिबीर या कार्यक्रमा करीता विरुर परिसरातील हजार त बाराशे नागरिक उपस्थित होते त्यापैकी 1015 नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली, यावेळी जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर हजर होते त्यामधे डॉ लहू कुळमेथे वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय राजुरा, डॉ अभय मुन वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोली, डॉ एलिझाबेथ जोसेफ आशाधाम हॉस्पिटल विरुर, डॉ संदीप बांबोळे बालरोगतज्ज्ञ, डॉ स्नेहल डाहूले वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगाव व डॉ अनिता आरके यांनी उपस्थित नागरिकांची तपासणी केली. विरुर ठाण्याच्या हद्दीत असे अनेक उपक्रम नवीनच रुजू झालेले ठाणेदार राहुल चव्हाण यांनी राबिवीत असल्याने त्यांची परिसरात स्तुती होताना दिसत आहे

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top