गंभीर जखमीं चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
सुतळीबॉम्बच्या स्फोटात तीन गंभीर तर तीन लोक किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी दि. १० नोव्हेबरला सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार पारधीगुडा येथील काही व्यक्ती खेळत असतांना नेताजी शेरकुरे नामक व्यक्ती प्लास्टिक पन्नी मध्ये चार सुतळी बॉम्ब घेऊन आला. त्यातून एक सुतळी बॉम्ब काढून त्याने फोडला. लोकांना काही समजायच्या आत त्या बॉम्बची चिंगारी उडून बाकीचे सर्व सुतळी बॉम्ब फटाके फुटायला लागले. यात तेथील रमेश पवार वय ४२, धनराज शेरकुरे वय ३५, अनिल शेरकुरे वय २८ यांच्या हातापायाला गंभीर इजा पोहचली तर उमेश काळे वय ३५, रमेश शेरकुरे वय १८, लहू काळे वय २२ रा. पारधीगुडा हे किरकोळ जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांनी लागलीच कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.