Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एसटी कर्मचाऱ्यांचा संप - पुन्हा 14 कर्मचारी निलंबित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन दिवसांत 28 कर्मचाऱ्यांचे निलंबन "एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी?" सामान्य जनतेला माहिती होण्यासाठी राजूरात निघाली ...











































  • दोन दिवसांत 28 कर्मचाऱ्यांचे निलंबन
  • "एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी?" सामान्य जनतेला माहिती होण्यासाठी राजूरात निघाली "संदेश रॅली"
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या संदेश रॅलीने दुमदूमले राजुरा शहर
  • अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी दर्शविला पाठिंबा
  • रॅलीतील बालकानी वेधले लक्ष
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी राज्य स्तरावर गेल्या चौदा दिवसांपासून कामगारांचा संप सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महामंडळाच्या बसेस पूर्णपणे बंद असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून संपकरी कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांच्या या त्रासाला संपकरी कामगारांपेक्षा शासन जबाबदार असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण कशासाठी व का ? या संदर्भात राजुरा शहरात संपकरी कामगारांच्या कृती समितीच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संदेश रॅलीचे आयोजन करण्यात आले. राजुरा शहरातील बस स्थानक येथून सकाळी 11 वाजता या रॅलीला सुरुवात झाली. संविधान चौक, पंचायत समिती जवळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून नाका नंबर 3, भारत चौक, गांधी चौक, नेहरू चौक, जुने बस स्थानक, तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन मुख्य बसस्थानकामध्ये संदेश रॅलीचा समारोप झाला. तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अनिल काळू याना निवेदन देण्यात आले. संदेश रॅली ला अनेक सामाजिक, राजकीय संघटनांचा पाठिंबा होता. या संदेश रॅलीमध्ये अनेक नागरिक व सामाजिक, राजकीय संघटनांना सहभागी झाल्या होत्या. गांधी चौक येथे राधेश्याम अडानिया, सभापती, न.प. राजुरा, सचिन डोहे, रवी बुरडकर यांनी भाजपा च्या वतीने पाणी वाटप केले. नेहरू चौक येथे जीवनदीप पर्यावरण व सर्प मित्र संस्था, कोंडावार, नेफडो च्या तालुका संघटिका किरण हेडाऊ यांच्या चाय व बिस्कीट देण्यात आले. समारोप स्थळी छावा फाउंडेशन च्या वतीने मसाला भात व जिलेबी वितरित करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे राजू झोडे व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले यांनी एस. टी. कर्मचाऱ्यांना संबोधित करत आपले समर्थन जाहीर केले. सूत्रसंचालन सुरेश पुट्टेवार यांनी तर आभार मनोज कोल्हापूरे यांनी मानले. एस.टी. कर्मचारी संपकरी कृती समिती ने या रॅलीत सहभागी नागरिकांचे आभार व्यक्त केले.
एसटी महामंडळाने काम बंद आंदोलन करणार्‍या कर्मचार्‍यांविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली असुन काल चंद्रपूर जिल्ह्यातील 14 तर राज्यातील 376 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. इतर तालुक्यातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाही होण्याची शक्यता असल्याचे संपकरी कामगारांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले होते. त्यातच आज पुन्हा 14 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश निर्गमित झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यापुढेही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू राहण्याची शक्यता असुन कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न शासनाद्वारे सुरु असल्याचे कामगार संघटनेच्या नेत्यांनी सांगितले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top