आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
स्थानिक देशपांडे वाडीतील रहिवाशी अनिरुद्ध नानाजी डाखरे याला वैद्यकीय शिक्षणासाठी असलेल्या नीट परीक्षेत 720 पैकी 710 गुण मिळून तो संपूर्ण भारतात 38 वा आला असून इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांमधे त्याने 9 वे स्थान पटकाविले आहे. त्याच्या या यशाबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी त्यांचे घरी जावून अनिरुद्ध डाखरे आणि त्याच्या आई व वडिलांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान विरोधी पक्षनेते रमेश नळे, नगरसेवक दिलीप देरकर, प्राचार्य संभाजी वारकड, बळीराम खुजे, बंडू देठे, स्वप्निल पहानपटे, नानाजी डाखरे, उषा डाखरे उपस्थित होते.
विशेष म्हणजे शिक्षक नानाजी डाखरे यांच्या दोन्ही मोठ्या मुली कु. अक्षदा, कु. वैष्णवी वैद्यकिय शिक्षण घेऊन डॉक्टर झाल्या आहेत. आता तिसरा मुलगा वैद्यकिय परीक्षेत प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण झाला आहे. याबद्दल माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी या मुलांचे आणि त्यांच्या आईवडिलांचे कौतुक केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.