Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: प्रकल्पस्तरीय समितीवर प्रदीप गेडाम यांची निवड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजेश अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - आदिवासी समाजाच्या विविध समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न व संघर्ष के...











































राजेश अरोरा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
आदिवासी समाजाच्या विविध समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न व संघर्ष केल्याबाबतची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने आदिवासीच्या कल्याणाच्या योजनाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी प्रकल्पस्तरीय समिती चंद्रपूर या समितीवर बल्लारपूर तालुक्याचे शिवसेनेचे समन्वयक प्रदीप गेडाम यांची निवड केली आहे. 
ही समिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपुर या विभागाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधी या समितीच्या मार्फत खर्च करण्यात येणार असल्याने समितीला अन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
या समितीवर निवड केल्या बद्दल त्यांनी शासनाचे आभार व्यक्त केले व शासनाकडून प्राप्त निधीचा पुरेपूर वापर करण्यात येईल व कोणत्याही परिस्थितीत निधी अखर्चित राहणार नाही याची दक्षता घेणार असे आश्वासन प्रकल्पस्तरीय समितीचे सदस्य प्रदीप गेडाम यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना दिले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top