Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आपले सरकार सेवा केंद्र कोरपनाच्या वतीने बांधला वनराई बंधारा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बिडीओंची उपस्थिती धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - आपले सरकार सेवा केंद्र कोरपनाच्या वतीने चोपण गावातील नाल्यावर नुकताच व...





























  • बिडीओंची उपस्थिती
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
आपले सरकार सेवा केंद्र कोरपनाच्या वतीने चोपण गावातील नाल्यावर नुकताच वनराई बंधारा बांधकाम करण्यात आला. यावेळी माजी सभापती तथा विद्यमान पंचायत समिती सभापती शाम दिवे, माजी उपसभापती संभाशिव कोवे, माजी जिप सदस्य उत्तम पेचे, सामाजिक कार्यकर्ते सुरेश मालेकर, गटविकास अधिकारी दिलीप बैलनवार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आपले सरकार केंद्राचे तालुका व्यवस्थापक अमोल साखरकर व विविध ग्रामपंचायतीचे केंद्रचालक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top