Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर यांचा वाढदिवसा प्रसंगी 'बाळूच्या' माध्यमातून कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाढदिवसाप्रसंगी बंटीभाऊ ने जोपासली माणुसकी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - युवासेनेचे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी मालेकर यांच्या वा...
  • वाढदिवसाप्रसंगी बंटीभाऊ ने जोपासली माणुसकी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
युवासेनेचे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी मालेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळू संस्थेच्या माध्यमातून कुपोषित बालकांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतून हा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी शिवसेनेचे विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, बाळू संस्थेचे प्रणेते अमित महाजनवार, शिवसेना उपतालुका प्रमुख रमेश झाडे, शिवसेना तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, युवा सेना शहर चिटणीस स्वप्निल मोहूर्ले, युवा सेना तालुका चिटणीस (संघटक) कुणाल कुडे, युवा सेना तालुका चिटणीस वतन मादर, अतुल खनके इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top