राजुरा -
रोटरी क्लब राजुरा व राज्य रक्त संक्रमण परिषद, महाराष्ट्र राज्य (SBTC), यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने स्थानिक राम मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमात 28 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ लहु कुडमेथे, अधीक्षक संजय गावीत, रक्तपेढी तंत्रज्ञ जय पचारे, रक्तपेढी तज्ञ अपर्णा रामटेके, सहाय्यक चेतन वैरागडे व रुपेश घुमे ह्यांनी आपल्या सेवा प्रदान केल्या तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष नवल झंवर, सचिव कमल बजाज, कोषाध्यक्ष रिशभ गोठी, अमोल कोंडावार, निखिल देशपांडेे, सुहास बोबडे, निखिल शेरकी, अझहर शेख, अमजद खान, गणेश पेटकर, राहुल अवधूत, निखिल चांडक, कविश्वर खणके, आनंद चांडक, मयूर बोनगिरवार, किरण ढुमने यांनी परिश्रम घेतले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.