राजुरा -
मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका समन्वयक योगेश मोरे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपुर व जिल्हा परिषद चंद्रपूर वतीने राजुरा तालुक्यात "SCALE" कार्यक्रमा अंतर्गत १२ ते १६ वर्षे वयोगटातील ५८५४ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास" हा कार्यक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचा हा उपक्रम राजुरा तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळांमध्ये राबवित येत आहे. हा SCALE कार्यक्रम शिक्षकांच्या माध्यमातून शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी याची रूपरेषा व कार्यपद्धती समजून येण्याच्या अनुषंगाने दि.११ ते १४ आक्टोबर २०२१ स्थानिक नक्षत्र हाॅल येथे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व खाजगी शाळा यातील ८० निवडक शिक्षकांची चारदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोप समारंभासाठी उपस्थित प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, गटशिक्षणाधिकारी विजय पारचाके, विस्तार अधिकारी मेश्राम, हेडाऊ, प्रशांत लोखंडे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस फाउंडेशन चंद्रपूर व सर्व शाळेतील शिक्षक व संसाधन व्यक्ती उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.