चंद्रपुर -
बांगलादेशात वारंवार हिंसाचाराला बळी पडत असलेल्या अल्पसंख्याकाना न्याय आणि संरक्षण मिळावे या मागणीसाठी इस्कॉन चंद्रपूर निषेध आणि प्रार्थना सभेचे आयोजन करत आहे. रविवार 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते 7 या वेळेत जटपुरा गेटजवळ बांगलादेशातील निरपराध अल्पसंख्याकावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात शांततापूर्ण कीर्तनाचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण चेतना संघातर्फे करण्यात आले आहे. बांगलादेशातील इस्कॉन मंदिरे, दुर्गा पंडाल आणि अल्पसंख्याक समुदायावर नुकत्याच झालेल्या हिंसक हल्ल्यांमुळे अल्पसंख्याक समाज हादरलेला आणि दु:खी झाला आहे. या सर्व अल्पसंख्याक समुदायांच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्यासाठी इस्कॉनतर्फे लंडन, वॉशिंग्टन, डीसी, न्यूयॉर्क, टोरंटो, पोर्ट लुईस, डर्बन, मेलबर्न यासह जगातील प्रमुख शहरांमध्ये आंदोलने आयोजित केली जात आहेत. याअंतर्गत चंद्रपुरातही शांततेत कीर्तन निषेध आयोजित केला जात आहे. निषेध आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन इस्कॉन चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.