Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: बरांज कोळसा खाण प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या आंदोलनाची यशस्‍वी सांगता
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व कोळसा मंत्री प्रल्‍हाद जोशी यांनी घेतली दखल आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर - गेल्‍या अनेक वर्षापासून ...
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व कोळसा मंत्री प्रल्‍हाद जोशी यांनी घेतली दखल
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
गेल्‍या अनेक वर्षापासून चंद्रपूर जिल्‍हयातील भद्रावती तालुक्‍यातील बरांज या गावी कोळसा खाणीतुन कोळश्‍याचे उत्‍खन्‍नन सुरू होते. त्‍यामध्‍ये त्‍या परिसरातील अनेक नागरिकांच्‍या जमीनी कंपनीने अधिग्रहण करून त्‍याबदल्‍यात नोकरी देण्‍याचे आश्‍वासन दिले होते. नोकरी न दिल्‍यास त्‍याचा मोबदला देण्‍याचे कबुल केले होते. याशिवाय अनेक गोष्‍टी गावक-यांना कबुल करून त्‍याची पूर्तता कंपनीने केली नव्‍हती.
यासर्व प्रश्‍नांची सोडवणूक करण्‍याच्‍या दृष्‍टीने गावक-यांचे व तालुक्‍यातील भाजपाच्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांचे एक शिष्‍टमंडळ आ. सुधीर मुनगंटीवार यांना भेटले. नेहमीप्रमाणे आ. मुनगंटीवार यांनी या प्रश्‍नाला अतिशय गांभीर्याने घेत यासंदर्भातील एक बैठक मुंबईला खाण अधिकारी व शासकीय अधिकारी यांच्‍यासोबत लावली. त्‍यात खाण अधिका-यांनी १५ दिवसात प्रश्‍न सोडवू असे आश्‍वासन दिले होते. परंतु त्‍या संदर्भात कंपनीने काहीही न केल्‍यामुळे आ. मुनगंटीवार यांनी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एक मोठे आंदोलन करण्‍याचे आदेश दिले.
त्‍याच अनुषंगाने दिनांक १३ ऑक्‍टोंबर २०२१ या दिवशी आ. मुनगंटीवार यांच्‍या उपस्थितीत व देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात एक मोठे आंदोलन करण्‍यात आले. त्‍याठिकाणी आ. मुनगंटीवार यांनी खाण त्‍वरीत बंद करण्‍याचे निर्देश दिले. तसेच बरांजला जाणारा रस्‍ता खाणीच्‍या वापरासाठी बंद करण्‍याचे निर्देश दिले. त्‍यानंतरही गेल्‍या तीन दिवसात देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात यशस्‍वी आंदोलन सुरू होते. यासर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री मा. अमीतजी शाह यांनी केंद्रीय कोळसा मंत्री मा. प्रल्‍हादजी जोशी यांना याप्रकरणी गंभीरपणे लक्ष्य घालण्‍यात सांगीतले. त्‍यानुसार मा. खाण मंत्र्यांचे पत्र आ. सुधीर मुनगंटीवार यांना आजच प्राप्‍त झाले असून सर्व संबंधितांसह यासंदर्भातील बैठक दिल्‍लीला लावण्‍याचे निर्देश दिल्‍याचे त्‍यात नमूद आहे.
मा. गृहमंत्री व मा. कोळसा मंत्री यांच्‍या निर्देशानुसार ही बैठक लागणार असून तोपर्यंत या आंदोलनाला यशस्‍वीपणे तात्‍पुरती स्‍थगिती देण्‍याचा निर्णय आज घेण्‍यात आला. यासाठी सर्व प्रकल्‍पग्रस्‍तांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मनापासून आभार मानले असून देवराव भोंगळे यांच्‍या नेतृत्‍वात हा लढा पुढे चालु राहील असा निर्धार करण्‍यात आला आहे.
आंदोनलाच्‍या यशस्‍वीतेसाठी भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंद्रकांतजी गुंडावार, भाजयुमोचे महाराष्‍ट्र प्रदेश उपाध्‍यक्ष विवेक बोढे, भाजयुमो महाराष्‍ट्र प्रदेश सचिव अनिल डोंगरे, भद्रावती तालुका भाजपाध्‍यक्ष नरेंद्र जिवतोडे, प्रविण ठेंगणे, आशिष देवगडे, संजय ढाकणे, संजय रॉय, चेतन शिंदे, आकाश वानखेडे, मारोती गायकवाड, माधव बांगडे, इमरान खान, अफजलभाई, प्रविण सुर, प्रविण सातपुते, किशोर गोवारदिपे, यशवंतभाऊ वाघ, अमित गुंडावार, विजय वानखेडे, तुळशिराम श्रीरामे, प्रशांत डाखरे, संतोष नागापुरे, सत्‍तारभाई यांनी प्रयत्‍न केले.







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top