Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अंबुजा सिमेंट कंपनीत कामगाराच्या आकस्मिक मृत्यूने कामगाराचे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कंपनी तर्फे ठेकादार द्वारा 15 लाख देण्याचा करार व मुलाला ठेकेदाराकडून नोकरी मराठा सिमेंट कामगार संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेशबाबू पुगल...
  • कंपनी तर्फे ठेकादार द्वारा 15 लाख देण्याचा करार व मुलाला ठेकेदाराकडून नोकरी
  • मराठा सिमेंट कामगार संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने प्रकरण शांत
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
उपरवाही येथिल अंबुजा सिमेंट कंपनीत 7 ऑकटोबरला ठेकेदारी कामगाराचा जेवणाच्या सुट्टीत अचानक झालेल्या मृत्युनंतर कंपनीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार मराठा सिमेंट वर्क्स उपरवाही येथिल अंबुजा सिमेंट कंपनीत गुरुवारला ठेकेदार मे. विजया अँड कंपनीतील कामगार गणेश भिमराव कोडापे हा दुपारी 1.20 वाजता जेवणाच्या सुट्टीत अचानक बेशुध्द होउन खाली पडला. त्याला तातडीने गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले. कामावर असतांना मृत्यु झाल्याने कामगारांनी मृत कामगाराच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी करत सर्व कामगार एकवटले. मराठा सिमेंट कामगार संघटनाचे अध्यक्ष व माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांना घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाला बोलून मृतक कामगाराला आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न केले. कामगारांनी मृतक कामगाराचे शव मेन गेटवर ठेवून आंदोलन सुरू करताच अंबुजा सिमेंट प्रशासनाने आणि कामगार नेत्यांत बैठकीला सुरूवात झाली. 
कंपनी प्रशासनाकडून यूनिट हेड अश्विन रायकुंडलिया, एच.आर. हेड राम व्दिवेदी व कामगार नेते नरेश बाबू पूगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल सेक्रेटरी अजय मानवटकर, जॉइंट सेक्रेटरी बलको, कमिटी मेंबर इकबाल शेख यांच्यात रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत मृत झालेल्या कामगाराच्या कुटुंबाला कंपनी तर्फे ठेकादार द्वारा 15 लाख देण्याचा करार करण्यात आला. या व्यतिरिक्त मृताकाच्या कुटुंबाला नियमानुसार मिळणारी बाकी रक्कम व मृतकाच्या मुलाला ठेकेदाराकडून कामावर ठेवण्याचा करार करण्यात आला. तसेच मृतक कामगाराच्या मुलीला अंबुजा विद्या निकेतन शाळा येथे शिकवण्यात येण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top