- शहरातील एकूण २ लाख ४८ हजार ६२५ व्यक्तींना लस
- १ लाख ६७ हजार १८९ व्यक्तींनी घेतली पहिली मात्रा
- ८१ हजार ४३६ व्यक्तींची दुसरी मात्राही पूर्ण
चंद्रपूर -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी २० लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात लसीकरण आपल्या दारी आणि नवरात्रीनिमित्त विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले. त्यामुळे आठवडाभरात लस घेणाऱ्यात १२ हजार व्यक्तीची भर पडली. आता एकूण लसीकरण झालेल्या नागरिकाचा आकडा २ लाख ४८ हजार ६२५ पोहोचला असून, ८१ हजार ४३६ पात्र व्यक्तींची दुसरी मात्राही पूर्ण झाली आहे. दरम्यान, मनपाच्या आरोग्य विभागामार्फत घरोघरी सर्व्हे करून लस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे.
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु झाली. प्रारंभी आरोग्य सेवेतील व्यक्तींना मात्रा देण्यात आली. त्यात ७ हजार ९५९ आरोग्य सेवकांना पहिला डोस, तर ६ हजार ८४७ जणांना दुसरा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या पोलिस, महसूल व इतर अत्यावश्यक सेवेतील ७ हजार ८६८ जणांना पहिला डोस व ६ हजार ८६५ जणांना दुसरा डोस देण्यात आला.
तिसऱ्या टप्प्यात १ एप्रिलपासून ४५ ते ६० वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे धोरण शासनातर्फे अवलंबण्यात आले. आतापर्यंत ४४ हजार ३३९ पहिला डोस तर २७ हजार ५९० व्यक्तींचा दुसरा डोस पूर्ण झाला. शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले. यात ८२ हजार २५५ व्यक्तींनी पहिला डोस तर २३ हजार २७१ व्यक्तींनी दुसरा डोस पूर्ण केला. ६० वर्षावरील २४ हजार ७६८ व्यक्तीना पहिला डोस, तर १६ हजार ८६३ व्यक्तींनी दुसरा डोस पूर्ण झालेला आहे.
- आरोग्य सेवक ...... ७९५९..... ६८४७
- फ्रंटलाईन वर्कर ....... ७८६८... ६८६५
- १८ ते ४४ वर्ष वयोगट.... ८२२५५ ........२३२७१
- ४५ ते ६० वर्ष वयोगट ..... ४४३३९...... २७५९०
- ६० वर्षावरील .........२४७६८.......... १६८६३
- पहिली मात्रा : १,६७१८९
- दुसरी मात्रा : ८१,४३६
- एकूण २४,८६२५
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.