Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिक्षक दिनाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी केला शिक्षकांचा सत्कार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नांदा येथील जिप शाळेच्या १९८६ च्या १ ली वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - नांदा फाटा ...
  • नांदा येथील जिप शाळेच्या १९८६ च्या १ ली वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
नांदा फाटा शाळेत शिकून बाहेर पडल्यानंतर विविध पदावर काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत शिक्षकांचा नुकताच सत्कार केला. शिक्षकांनी आपल्या शिक्षणासाठी घेतलेल्या परिश्रमाची परतफेड म्हणून नांदा येथील जिप शाळेच्या १९८६ च्या १ ली वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी हा सत्कार आयोजीत केला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नांदा येथे हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून जिप सदस्य शिवचंद्र काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोहिद शेख, माजी प्राचार्य गिरिधर बोबडे, माजी ग्रामपंचायत सदस्य उर्मिला मडावी, मुख्याध्यापक के. डी. मेंडूले, विशेयतज्ञ विकास भंडारवार, शिक्षक गोविन्द गुप्ता, सौ. मीना गज्जलवर, सौ. खुस्पुरे मॅडम, सौ. तुम्मे मॅडम, गुलाब राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी शाल, श्रीफळ, स्मृतचिन्ह देऊन शाळेतील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. नुकतेच नांदा जिल्हा परिषद शाळा शाळेला आयएसओ नामांकन प्राप्त झाले असून शाळेतील वाढती विद्यार्थी संख्या आणि शिक्षक घेत असलेले परिश्रम यासाठी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी पुरुषोत्तम निब्रड, संदीप खिरटकर, भास्कर गोंडे, राम रोगे, दादाजी कामटकर, हारुण सिद्धिकी, उमेश पोहाने, चंद्रशेखर राऊत, प्रकाश राऊत, सुभाष खोके, प्रशांत नवले, पोहनकर, परचाके आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शाळेला 150 प्रमाणपत्र प्राप्त झाले असून पुढेही शाळेच्या नावलौकिक उत्तम दर्जा व विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषद शाळा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी शिक्षक गुप्ता यांनी सांगितले तर यापुढेही माजी विद्यार्थी संघ शाळेच्या प्रगतीसाठी मदत करीत राहील असे पुरुषोत्तम निब्रड यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन राम रोगे यांनी केले प्रस्ताविक हारुण सिद्धिकी यांनी केले यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top