Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लोहाणा युवक मंडळाची कार्यकारिणी घोषित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रुपीन सादरानी यांची अध्यक्षपदी तर चिराग नथवानी सचिवपदी नियुक्ती मंडळातर्फे लवकरच भव्य एक्यूप्रेशर शिबिराचे आयोजन शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्र...
  • रुपीन सादरानी यांची अध्यक्षपदी तर चिराग नथवानी सचिवपदी नियुक्ती
  • मंडळातर्फे लवकरच भव्य एक्यूप्रेशर शिबिराचे आयोजन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
श्री लोहाणा महाजन चंद्रपूर व लोहाणा महिला मंडळ चंद्रपूर तर्फे श्री मनीषभाई महाराज तसेच लोहाणा महाजन चंद्रपूर चे अध्यक्ष नविन नथवानी यांच्या मार्गर्शनाखाली भव्य एक्यूप्रेशर शिबिर आयोजित करण्यात येत आहे. एक्यूप्रेशर ही उपचाराची एक प्राचीन पद्धत आहे. स्पर्धेच्या युगात, तत्काळ उपचाराची सुविधा समाजाला ऍलोपॅथीकडे घेऊन जात आहे. हि उपचारपद्धती महागडे असण्याबरोबरच, या पद्धतीद्वारे उपचाराचे दुष्परिणामही आहेत. ही पद्धत कोणत्याही औषधाशिवाय उपचार करण्यायोग्य आणि असाध्य रोगांच्या उपचारांमध्ये प्रभावी आहे. समाजातील नागरिकांना एक्यूप्रेशर उपचार पद्धतीचा लाभ मिळावा याकरिता भव्य एक्यूप्रेशर शिबिर आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीर यशस्वी व्हावा अधिकाधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा याकरिता लोहाणा युवक मंडळाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणी मध्ये रुपीन सादरानी यांची अध्यक्षपदी तर चिराग नथवानी सचिवपदी, धवल राजा उपाध्यक्ष, अमित सागलानी सहसचिव, रोशन सादरानी कोषाध्यक्ष, प्रतीक ठक्कर सहकोषाध्यक्ष,  सदस्यपदी पियूष सागलानी, यश मानेक, निकुंज रायटट्टा, प्रेम मानेक, सत्यम सादरानी, दर्शन नथवानी, नारायण कारीया, चंद्रेश द्रोणा, करण सूचक तसेच सल्लागार समितीत निलेश सयानी, विवेक मानेक, मनीष नागरेचा, अनिश राजा, राजू द्रोणा, निखिल शेजपाल, राकेश सूचक, दिवेश काच्छेला, मनीष रायकुंडलियां यांची नियुक्ती करण्यात आली. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top