Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: काँग्रेस ओबीसी विभागाचे ग्रामीण व शहर तालुकाध्यक्ष जाहीर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संदिप आदे, उमेश मिलमीले, राहुल मालेकर यांची निवड आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - काँग्रेस ओबीसी विभाग चंद्रपूर च्या वतीने लोकप्रिय आ...
  • संदिप आदे, उमेश मिलमीले, राहुल मालेकर यांची निवड
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
काँग्रेस ओबीसी विभाग चंद्रपूर च्या वतीने लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुका काँग्रेस ओबीसी विभाग चे ग्रामीण व शहर तालुकाध्यक्ष यांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राजुरा काँग्रेसचे ओबीसी ग्रामीण तालुकाध्यक्ष म्हणून उमेश रघुनाथ मिलमिले व राजुरा शहराध्यक्ष संदीप आदे यांची निवड करण्यात आली. तर ओबीसी विभाग ग्रामीण कोरपना तालुकाध्यक्ष म्हणून राहुल देविदास मालेकर यांची सुद्धा निवड करण्यात आली.      
या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, ओबीसी विभाग ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई, सुरेश पाटील मालेकार यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top