Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजूराचा गानकोकिळा चे आकाशवाणीवर सुंदर प्रस्तुतीकरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव पर्वावर स्वर प्रीती अकादमी राजुरा ने सादर केले आकाशवाणीवर देशभक्तीपर गायन बघा व्हिडीओ  आमचा विदर्भ - ब...
  • १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव पर्वावर
  • स्वर प्रीती अकादमी राजुरा ने सादर केले आकाशवाणीवर देशभक्तीपर गायन
  • बघा व्हिडीओ 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव पर्वावर स्वर प्रीती कला अकादमी राजुरा चा संयोजिका सौ. अलका दिलीप सदावर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर आणि सर्व प्रांतीय भाषिक समूह गीत गायनाचा कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणीवर प्रसारित करण्यात आला. यात मुख्य गायन सौ. अलका सदावर्ते यांनी केले तर त्यांना सौ. मीरा कुलकर्णी, सौ. नम्रता खोंड, सौ. अनुष्का राईच, सौ. वर्षा वैद्य, सौ. प्रतिभा भावे, सौ. मेघा धोटे, सौ. स्वरूपा झंवर, सौ. राजश्री उपगन्लावर, सौ. सुनैना तांबेकर, सौ. सुनीता कुंभारे, सौ. विना देशकर यांची साथसंगत लाभली. तबला पेटीवर मोहन मेश्राम, रत्नाकर नक्कावार व अरविंद लांडे यांची साथसंगत मिळाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मीना लांडे यांनी केले. आकाशवाणीवर राजूराचा महिलांनी सुंदर प्रस्तुतीकरण करून आपल्या सुरांसह स्वरांच्या जादूने कार्यक्रम ऐकणाऱ्या रसिकांना मोहून टाकले होते. 
राजकारण, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, संगीत, व्यवसाय आदी क्षेत्रांत महिला आपल्या कर्तृत्वाचा झेंडा उभारत आहेत. संसार सांभाळून, नोकरी-व्यवसायात उंच भरारी घेणाऱ्या अनेकजणी तारेवरची कसरत करत यशस्वी होत आहेत. अनेक अडीअडचणींवर मात करीत ‘ति’चा अखंडित प्रवास सुरू आहे. अशा कर्तृत्वान महिलांच्या कार्याचा घेतलेला हा वेध... 

स्वर प्रीती कला अकादमीचा मागील वीस वर्षाचा प्रवास
राजुरा शहरात व संपूर्ण जिल्ह्यात स्वर प्रीती कला अकादमी परिचित आहे. मागील वीस वर्षांपासून शासकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात कला संगीतमय कार्यक्रम अविरतपणे सुरु आहे. या संस्थेचे अध्यक्ष दिलीप सदावर्ते आहेत व सौ. अलका सदावर्ते या संगीत अकादमीची धुरा सक्षमपणे सांभाळीत आहेत. 
दिलीप सदावर्ते यांनी वीस वर्षे शासकीय कार्यक्रमात तहसील कार्यालयाच्या प्रांगणावर सर्व राष्ट्रीय उत्सवाची जवाबदारी आपल्या संचालनातून सर्व राष्ट्रीय उत्सवाची जबाबदारी आपल्या संचालनातून पार पाडीत आहे. विविध कार्यक्रमातून सौ. अलका सदावर्ते यांनी आपला कला अविष्कार सादर केला आहे. विविध सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी गृहिणी, शिक्षिका व इतर महिलांना मार्गदर्शन करून गीत सादरीकरणाची संधी उपलब्ध करून दिली. संगीत क्षेत्रातील त्यांचे हे उत्कृष्ट कार्य बघता त्यांना राजुरा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे. सौ. अलका सदावर्ते यांना हा पुरस्कार देते वेळी राजूराच्या गानकोकिळा म्हणून गौरव करण्यात आला होता हे येथे विशेष. 
स्वर प्रीती अकादमीच्या माध्यमातून त्यांचे कार्यक्रम सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून करीत असतात. त्यांचे बरेच विद्यार्थी गायन क्षेत्रात नावलौकिकास पात्र ठरले आहे. 











Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top