Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री-स्कूल तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बालकांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश अनंता गोखरे - आमचा विदर्भ उपसंपादक राजुरा - कलागुण हे उपजत असतात मात्र त...
  • बालकांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांची विचारशक्ती वाढविने हा उद्देश
अनंता गोखरे - आमचा विदर्भ उपसंपादक
राजुरा -
कलागुण हे उपजत असतात मात्र त्यांना योग्य व पोषक वातावरण मिळाल्यास ते गुण वृद्धिंगत होऊन चांगला कलाकार निर्माण होतो. बालकांमधे असलेले कलागुण शोधुन काढणे त्याला प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या कलागुणांचा पालक तसेच समाजाला परिचय करून देण्याच्या उद्देशाने ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्रि स्कूल च्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 5 ऑगस्ट पासुन प्रवेशिका स्विकारणे सुरू झाले असुन अंतिम तिथी 15 ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. प्रवेशिका ऑनलाईन उपलब्ध असुन स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणार्‍या पालकांनी क्यू आर कोड स्कॅन करून आपल्या पाल्यांच्या प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेसाठी कुठलेही प्रवेश शुल्क आकारण्यात येणार नसुन प्रथम पुरस्कार 3000 रुपये रोख, द्वितीय पुरस्कार 2000 रुपये रोख, तृतीय पुरस्कार 1000 रुपये रोख व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top