- बघा व्हिडीओ
गडचांदूर -
सर्वदूर मागील दोन-तीन दिवसापासून थोडा थोडा वेळ थांबून सतत होत असलेल्या पाऊसा मुळे गडचांदूर भोयेगाव पुला वरून पाणी वाहू लागले आहे. सोबतच धरणाचे पाणी ही सोडल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गडचांदूर-चंद्रपूर मार्गावरील भोयगांव-धानोरा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली आल्याने शुक्रवारच्या रात्रीपासून वाहतूक बंद झाल्याची बातमी मिळाली आहे. वाहतूक बंद झाल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाची मोठी रांग लागली आहे. गडचांदुर, कोरपना आवारपुर वरून भोयेगांव मार्गी चंद्रपूर घूग्गुस कडे जाणाऱ्या लोकांना दुसऱ्या पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून जावे लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.