Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अवैधरित्या वाळूतस्करी करणारे ट्रॅक्टर वन अधिकाऱ्यांनी केले जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सहा आरोपीना अटक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स राजुरा - राजुरा वनपरिक्षेत्रात रात्रीची वनगस्ती करीत असतांना वन अधिकारी व त्यांच्या चमूने राम...
  • सहा आरोपीना अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
राजुरा वनपरिक्षेत्रात रात्रीची वनगस्ती करीत असतांना वन अधिकारी व त्यांच्या चमूने रामपूर नियत क्षेत्राचे कक्ष क्रमांक 153 मधील नाल्यातून रेतीचा अवैध रित्या तस्करी करीत असलेल्या ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली, मात्र, त्यांच्याकडे कोणतीही कायदेशीर परवानगी नसतांना वनक्षेत्रात नाल्यातून रेतीचा उपसा करून वाहतूक करीत असल्याने अवैधरित्या वाळू तस्करी करतांना ट्रॅक्टर मुंडा क्रमांक MH-34 L-5788 ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक MH34 A6615 जप्त करत आरोपीना वन अधिकाऱ्यांनी अटक केली. सदर कारवाही २६ ऑगस्टच्या मध्यरात्री करण्यात आली. 
या ट्रॅक्टर वरील मजुरांच्या बयानावरून ट्रॅक्टर मालक आनंद भिकाजी येवले व ट्रॅक्टर मधील मजुरांवर वन संवर्धन कायद्याचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी मजुरांना वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपवन संरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल यांचे मार्गदर्शनात वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट व वन कर्मचारी करीत आहे. ही कारवाई मध्यरात्री करण्यात आली असून या मोहिमेत वन परिक्षेत्र अधिकारी यांचे नेतृत्वात क्षेत्रसहायक संतोष संगमवार, वनरक्षक डी.एस. जाधव, वनरक्षक डी.आर. शेंडे, वनमजुर भाऊराव लांडे, नरेंद्र निखाडे उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top