Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
झरीजामणी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाची दहशत प्रेम नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी झरीजामणी - पांढरकवडा वन विभागाच्या झरी तालुक्यातील झरी जाम...
  • झरीजामणी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाची दहशत
प्रेम नरडलवार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
झरीजामणी -
पांढरकवडा वन विभागाच्या झरी तालुक्यातील झरी जामणी वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघाने पुन्हा एकदा विदर्भात दहशत निर्माण केली आहे. मांडवी बीटमध्ये असलेल्या पिवरडोल शिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका तरुण ठार झाला. अविनाश पवन लनगुरे वय १७ असे या मृत तरुणाचे नाव आहे. शनिवारी सकाळी हा वाघ शिकार फस्त करीत असल्याचे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. वाघाने तरुणावर हल्ला केल्याची माहिती समजताच पिवरडोल, पाटणबोरीसह जवळच असलेल्या गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. अनेकांनी या वाघाचे व्हिडीओ चित्रीकरण केले, तर अनेकांनी सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पोलिसांनी या वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला; परंतु आपल्याच मस्तीत शिकार फस्त करीत असलेल्या या वाघाने दाद दिली नाही. शेवटी पाच तासांनंतर वाघ जंगलात निघून गेला. पाटणबोरीजवळ असलेल्या पिवरडोल येथील हा तरुण शुक्रवारी रात्री गावाजवळ असलेल्या शेतशिवारात शौचास गेला होता. मात्र रात्री तो घरी न परतल्याने कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. पहाटे गावातील काही लोक शेतात जात असताना त्यांना मोबाइल व रक्त पडलेले आढळले. आजूबाजूला शोध घेतला असता त्यांना झुडपात वाघ शिकार फस्त करीत असल्याचे दिसले.
मांडवी वनक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पाच वाघांचा मुक्त संचार आहे. या वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेक महिन्यांपासून होत आहे. मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top