Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कंत्राटी मजुरांना मास्क व अनु तेलचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय कोयला खदान मजदूर संघा कडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - भारतीय कोयला खदान मजद...
  • भारतीय कोयला खदान मजदूर संघा कडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती
विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
भारतीय कोयला खदान मजदूर संघा कडून वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील गोवरी एक्सपेन्सन माईन्स मध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करण्यात आली. खाणीत व ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी मजुरांना मास्क आणि अनु तेलचे वितरण करण्यात आले. अखिल भारतीय खदान मजदूर संघाचे  महामंत्री सुधीर घुरडे यांनी उपस्थित सर्व कंत्राटी कामगार व मजुरांना कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या खबरदारी घेण्याचे सांगितले. मास्क आणि अनु तेल वापरण्याचे फायदे समजावून सांगत कोरोना साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक, होमिओपॅथीच्या औषधाचे महत्त्व पटवून देऊन मास्क व अनु तेलचे वितरण करण्यात आले. वेकोलितील कंत्राटी कामगारांचे वेतन, सामाजिक सुरक्षिततेसाठी प्रयत्न करीत असल्याचे सुद्धा घुरडे यांनी सांगितले. यावेळी भा.को.ख.म.संघ वर्धा व्हॅली चंद्रपुर/बल्लारपुर महामंत्री जोगेन्दर यादव व इतर कामगार उपस्थित होते. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top