Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: कधी भर उन्हात तर कधी पावसात नागरिकांच्या लसीकरण केंद्रावर रांगा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ढिसाळ नियोजनाचा फटका ; सोशल डिस्टेंसिंगचा पडलाय विसर अनंता गोखरे - उपसंपादक राजुरा - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाचा...
  • ढिसाळ नियोजनाचा फटका ; सोशल डिस्टेंसिंगचा पडलाय विसर
अनंता गोखरे - उपसंपादक
राजुरा -
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. अशातच लसीकरण केंद्रावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे लस घेण्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत. त्यातच आज दुपारी १२ वाजताच्या दरम्यान स्थानिक देशपांडे वाडीतील मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहासमोर लसीकरणाकरिता महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या असतांना पावसाने हजेरी दिली. यात नागरिकांना पावसात भिजत रांगेत उभे राहावे लागले. यामुळे प्रशासनाच्या नियोजनाची पोल खुलली असून नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

योग्य नियोजन न झाल्याने नागरिक संतप्त
एकीकडे प्रशासनाकडून मास्कचा वापर करा, हाथ वारंवार धुवा व सोशल डिस्टेंसिंग ठेवत त्रिसूत्रच्या अंमलबजावणीकरिता जनजागृती करण्यात येत आहे. परंतु प्रशासकीय व्यवस्थेकडूनच लसीकरणाकेंद्रावर योग्य नियोजन नसल्याने सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडतांना चे चित्र दिसत आहे. कधी उन्हातान्हात तर कधी भर पावसात भिजत सकाळपासूनच नागरिकांना लसीकरणाकरिता रांगेत उभे राहावे लागत आहे. लसीकरण केंद्रावर नंबर लावतेवेळी बसण्याकरिता कोणतीही व्यवस्था नाही. तासनतास उभे राहून लस मिळेल कि नाही याचीही शाश्वती नाही. दोन दिवस लसीकरण बंद होते. त्यामुळे सोमवारी गर्दी होणार हे स्पष्ट असतानाही कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. परिणामी नागरिकांची गर्दी तर झालीच शिवाय भर उन्हात व पावसात नागरिकांना रांगेत उभे राहावे लागले. एकीकडे ग्रामीण पातळीवरील लसीकरण उत्तमरीत्या नियोजन करून सुरु असतांना त्यातून बोध घेत शहरी विभागातही उत्तम नियोजन करून लसीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top