चंद्रपूर -
दिवसा न दिवस घरगुती वापरासाठी गॅस चे दर सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत. करोना काळात जनता त्रस्त असताना सरकार ने आणखी 25 रुपये ने गॅस दर वाढ करण्यात आली. गॅस दरात सारखी वाढ होत असून जनतेला आर्थिक संकटात लोटत आहे. ह्या दरवाढीचा निषेध म्हणून 2 जुलै रोजी वरोरा नाका चौकात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे चे शहर अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या नेतृवात आंदोलन करण्यात आले. ह्या वेळेस गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, सुरेश रामगुंडे, शहर महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, शहर महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी, विभागीय अध्यक्ष मेघा रामगुंडे प्रज्ञा पाटील, उपाध्यक्ष चेतन धोपटे, निसार शेख, दीपक गोरडवार, धनंजय दानव, नगरसेविका मंगला आखरे, नितीन पिंपळशेंडे, वैष्णवी देवतळे, संभाजी खेवले, मुन्ना टेंबुरकर, अभिनव देशपांडे, विनोद लभाने, मुन्ना तेमबुरकर, राजेंद्र आखरे, नंदू जोगी, आकाश ठाकूर, विकास अडबाले, संजय अडबाले, राहुल देवतळे, शालीक भोयर, रेखा जाधव, सरस्वती गावंडे, कुणाल धेंगरे, कमलाकर पानघाटे, अब्दुल एजाज, अब्दुल जमील, उर्मिला यादव, कोमल मडावी, उर्मिला यादव, केतन जोरगेवार तसेच चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला युवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.