Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: व्यापाऱ्यांकरिता लसीकरणाची वेगळी व्यवस्था
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व मनपा द्वारा जलारामबाप्पा मंदिरात लसीकरण केंद्र सुरु शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - कर...

  • फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व मनपा द्वारा जलारामबाप्पा मंदिरात लसीकरण केंद्र सुरु
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
करोना प्रतिबंधासाठीच्या लसीकरण मोहिमेत आता चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. येत्या काही दिवसात लसीकरणाचे पहिल्या टप्प्यातील उद्दीष्ट पूर्ण होईल, असे मानले जात आहे. व्यापाऱ्यां व व्यापाऱ्यांकडे कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीया करिता लसीकरणाची वेगळी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ने निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाला केले होती. त्या मागणीला यश मिळाले असून गंज वॉर्डातील जलारामबाप्पा मंदिरात लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. आज लसीकरणाकरिता आलेल्या नागरिकांना 

श्री लोहाणा महिला महाजन मंडळातर्फे पाण्याच्या बाटलीचे वितरण करण्यात आले. यावेळी फेडरेशन ऑफ़ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम किशोर  सारडा, रामजीवन परमार, दिनेश नथवानी, चिराग नथवानी, अर्चना पोपट, लोहाणा महिला मंडळाच्या अध्यक्षा हंसा बेन पोपट, रेखा बेन ठक्कर,

मीना बेन नथवानी, कीर्ती बेन नथवानी, दिव्या बेन सूचक, हिना बेन पोपट, कल्पना बेन सूचक, मीनल बेन नथवानी, अपेक्षा बेन राजा, स्नेहल बेन राय,  कुंडलीय व लसीकरण केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. फेडेरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने लोहाणा महिला मंडळाचे आभार व्यक्त करण्यात आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top