Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डॉक्टर दाम्पत्याला मागितली एक कोटीची खंडणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महिला फॅशन डिझायनर गजाआड आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - मुलांच्या अपहरणाची भीती दाखवून डॉक्टर दाम्पत्याला एक कोटीच्या खंडणीची मागणी क...
  • महिला फॅशन डिझायनर गजाआड

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
मुलांच्या अपहरणाची भीती दाखवून डॉक्टर दाम्पत्याला एक कोटीच्या खंडणीची मागणी करणाऱ्या महिला फॅशन डिझायनरला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. 
शीतल इटनकर वय ४६, रा. मनीषनगर असे अटकेतील महिलेचे नाव आहे. शीतलचे पती बीएसएनएलमध्ये अभियंता आहेत. डॉ. तुषार सदाशिव पांडे वय ४८, रा. सोमलवाडा यांच्या तक्रारीवरून पालिसांनी ही कारवाई केली.
तुषार यांच्या पत्नीही डॉक्टर असून दोघांचे जयहिंद सोसायटीत उत्कर्ष मॅटर्निटी होम नावाचे हॉस्पिटल आहे. ११ जूनला तुषार यांना कुरिअरद्वारे चिठ्ठी मिळाली. तुमची मुलगी व मुलाला सुरक्षित पाहायचे असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल, खंडणी न दिल्यास वाईट परिणाम होतील, अशी धमकी त्यांना देण्यात आली. तुषार यांनी बेलतरोडी पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, साहाय्यक पोलिस आयुक्त नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक विकास मनपिया, हेडकॉन्स्टेबल तेजराम देवळे, अविनाश ठाकरे, रणधीर दीक्षित, शैलेश बडोदेकर, मिलिंद पटले, वंदना लोटे, गोपाल देशमुख, कमलेश गणेर, बजरंग जुनघरे, नितिन बावने, प्रशांत सोनुलकर, राजेंद्र नागपुरे, कुणाल लांडगे, सायबर विभागाचे दीपक तऱ्हेकर व मिथुन नाईक यांनी धमकीची चिठ्ठी पाठविणाऱ्याचा शोध सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी कुरिअर कंपनीत चौकशी केली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांना एक महिला ९५९३ या क्रमांकाच्या मोपेडवर जाताना दिसली. शोध घेतला असता मोपेड मनीषनगर परिसरात गेल्याचे आढळले. पोलिसांनी मनीषनगरमध्ये या मोपेडचा शोध सुरू केला. मंगळवारी रात्री पोलिसांना मोपेड आढळली. बुधवारी सकाळी पोलिसांनी शीतलला अटक केली. तिची १९ पर्यंत पोलिस कोठडी घेतली.

५० लाखांचे कर्ज फेडण्यासाठी...
शीतलला दोन मुली आहेत. तिच्या पतीने घर बांधण्यासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज घेतले. ते फेडण्यासाठी शीतलने खंडणी मागण्याचा कट आखला. काही महिन्यांपूर्वी शीतल व तिच्या पतीला करोना झाला होता. यावेळी डॉ. तुषार व त्यांच्या पत्नीने शीतल व तिच्या पतीवर उपचार केले. त्यामुळे शीतलने डॉ. तुषार यांना खंडणी मागण्याचा कट आखला. शीतलने एक कोटीच्या खंडणीची मागणी केली. १७ जूनला पहाटे ४ वजताच्या सुमारास पैसे असलेली बॅग मनीषनगरमधील एका रिकाम्या प्लॉटमध्ये ठेवायला तिने सांगितले होते. हा प्लॉट शीतलच्या घराला लागूनच आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top