- राजुरा येथील वृक्षप्रेमी भास्कर सर यांचा उपक्रम
![]() |
नगरसेविका उज्वलाताई जयपूरकर यांच्या मुलाच्या वाढदिवसा निमित्त आवळा वृक्षाचे वृक्षरोपण करतांना भास्कर गुरुजी |
हा उपक्रम नागरिकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. गत वर्षीच्या मार्च महिन्या पासून वृक्षप्रेमी भास्कर सर यांनी राजुरा येथील मालगुजारी तलाव, स्वामी विवेकानंद नगर, गणपती मंदिर परिसर, ग्रामीण रुग्णालय राजुरा, तक्षशिला नगर बामनवाडा, छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, नवजीवन कॉलनी, संकटमोचन हनुमान मंदिर येथे विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त व लग्नाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करून संवर्धन करण्याचा विडा उचलला आहे. एवढेच नव्हे तर ज्यांचा वाढदिवस व लग्नाचा वाढदिवस असतो अशावेळी ते त्यांना विविध वृक्ष भेट देतात. आतापर्यंत त्यांनी विविध वृक्ष जसे आंबा, पिंपळ, वड, आवळा, कडुलिंब, करंजी, भोकर वृक्ष भेट देऊन सोबतच वृक्षारोपणही ही केलेले आहे. सकाळी व सायंकाळी 2 तास वृक्षाच्या संवर्धनातही ते हातभार लावत आहे.
एकीकडे कोरोना काळात ऑक्सीजनसाठी नागरिकांचा जीव कासावीस होत असताना झाडे लावा, झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत त्यांनी वृक्षारोपण केले आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन याबरोबरच पक्ष्यांच्या पाण्यासाठी रिकाम्या प्लास्टिक बॉटल गोळा करून त्याचा वापर पाणी पिण्यासाठी करण्याचा प्रयत्न ही करत आहे. भारत लॉज ते स्वामी विवेकानंद नगर पर्यंत झाडांना बांधून त्याचा वापर केलेला आहे. एवढेच नव्हे तर हा उपक्रम आपल्या गावात व विध्यार्थी यांच्यात रुजविण्यासाठी त्यांना प्रेरणा सुद्धा देत आहेत.
त्यांच्या या कार्यात त्यांना विविध मान्यवरांचे व नागरिकांचे सहकार्य लाभत आहे त्यामध्ये नगराध्यक्ष अरुण धोटे, सर्वानंद वाघमारे, राममोहन पेंदापल्लीवार वनपाल, कुंदोजवार वनपाल, डॉ उमाकांत धोटे, गौतम देवगडे, किशोर पडोळे, पाचभाई, शरद मासिरकर, पेचे सर, बाबूराव मडावी, गटशिक्षणाधिकारी विजय परचाके, केंद्र प्रमुख शेषराव वानखेडे, केवलदास तोडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य त्यांना लाभत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.