- जिप उपाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर यांनी केले लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन
यवतमाळ -
पुसद तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र वनवारला येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्राचे चे उदघाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष भगवानराव आसोले, पो.पा. शरद कुबडे, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष अमोल फुके, सरपंच नामदेव ढाकरे, डॉ. गडदे, आरोग्य सेवक डॉ. सिमा वाघ व ग्रा.प. वनवारला चे सचिव विलास राठोड व गावातील प्रमुख नागरिक उपस्थित होते. यावेळी जिप उपाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर यांनी सर्व नागरिकांना लसीकरणात सहभागी होण्याचे आवाहन केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.