Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस गस्ती वाहनांचे हस्तांतरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम पोलिस विभागासाठी नव्याने 54 जीप आणि 95 दुचाकी प्राप्त रक्षक पाटील - आमचा वि...

  • महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम
  • पोलिस विभागासाठी नव्याने 54 जीप आणि 95 दुचाकी प्राप्त
रक्षक पाटील - आमचा विदर्भ प्रतिनिधी
यवतमाळ -
दि. 13 : आपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना त्वरीत सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र इमरजंन्सी रिस्पॉन्स सिस्टीम अंतर्गत ‘डायल 112’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात पोलिस गस्तीकरीता 54 जीप व 95 दुचाकी नव्याने प्राप्त झाल्या असून पोलिस विभागाला त्याचे हस्तांतरण राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.

पोलिस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला आमदार संजय राठोड, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ आदी उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री श्री. भुमरे यांनी नवीन जीपचे विधीवत पूजन व हिरवी झेंडी दाखवून सदर जीप पोलिस विभागाकडे हस्तांतरीत केल्या. तत्पूर्वी प्रास्ताविकात जिल्हा पोलिस अधिक्षक म्हणाले, यापूर्वी पोलिसांच्या मदतीसाठी, अग्निशमन सेवेसाठी तसेच रुग्णवाहिकेसाठी विशिष्ठ क्रमांक आहे. त्याच धर्तीवर आता आपात्कालीन मदतीसाठी ‘डायल 112’ हा क्रमांक उपलब्ध झाला आहे. या क्रमांकावर कोणत्याही नागरिकाने मदतीसाठी कॉल केला तर कोणत्या जिल्ह्यातून फोन आला, याची माहिती राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल. त्यानुसार सदर संदेश संबंधित जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षाला कळविण्यात आल्यावर फोन करणा-या नागरिकाला तात्काळ मदत उपलब्ध करून येईल. 

जिल्ह्याला नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत 54 जीम व 95 दुचाकी साठी 6 कोटी 44 लक्ष रुपये जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर करण्यात आला आहे. सदर वाहने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, सर्व पोलिस ठाणे आदी ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमाचे संचालन अशोक कोठारी यांनी केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक डॉ. खांडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बावीस्कर, स्थानिक गुन्हे शाखेचे ठाणेदार प्रदीप परदेशी, अवधुतवाडी ठाण्याचे ठाणेदार श्री. केदारे, राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे आदी उपस्थित होते. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top