Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकरी संघटनेच्या दलित आघाडीचे तालुकाध्यक्ष व सिंधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आनंद चहारे यांचे दुःखद निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा - शेतकरी संघटनेच्या दलित आघाडीचे तालुकाध्यक्ष व सिंधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, सामाजीक कार्यकर्ते आनंद विश्वनाथ चहारे, वय 55 यांचे क...


राजुरा -
शेतकरी संघटनेच्या दलित आघाडीचे तालुकाध्यक्ष व सिंधी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, सामाजीक कार्यकर्ते आनंद विश्वनाथ चहारे, वय 55 यांचे कोरोनामुळे चंद्रपूर येथे निधन झाले.

आनंद चहारे हे शेतकरी संघटनेचे जेष्ठ कार्यकर्ते होते. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. दोन आठवड्यापूर्वी त्यांचे वडील विश्वनाथ चहारे यांचे कोरोना मुळे निधन झाले होते. त्यानंतर आनंद हेही बाधित झाल्याने चंद्रपूर रूग्णालयात उपचार सुरू होता. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी नेण्यास सांगण्यात आले.त्यांना नागपूरला नेतांनाच रस्त्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व आप्तपरिवार आहे. 

शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, प्रभाकर दिवे, रमेश नळे, प्रभाकर ढवस, पी.यू.बोंडे, दिनकर डोहे, मधुकर चिंचोलकर यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top