Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: उत्खननात निघाली शिवपिंड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथील घटना खासदार अशोक नेते यांनी घेतले शिवपिंडी चे दर्शन माजी बां...

  • सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथील घटना
  • खासदार अशोक नेते यांनी घेतले शिवपिंडी चे दर्शन
  • माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी सुद्धा घेतले कुटूंबियांसमवेत दर्शन
  • दर्शनसाठी भाविकांची गर्दी

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
सावली -
सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वाहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे 25 मे ला नवीन मंदिराचे बांधकाम करण्यासाठी कॉलम करिता जेसीबी ने खोदकाम करत असतांना मातीखाली दबलेली अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंच ची पुरातन शिवपिंडी आढळून आली. खोदकाम करते वेळी दगड असावा या विचाराने एकाने माती बाजूला सारली मोठे आकारात असलेल्या दगडासारखे दिसत असल्यामुळे आजूबाजूची माती सारण्यात आली. माती सारल्यानंतर मातीतील शिवपिंड वरचेवर दिसू लागली. जेसीबीच्या बसूनही शिवपिंडीचे नुकसान झाले नाही. शिवपिंड दिसताच क्षणी उपस्थितांनी हर हर महादेवच्या गजर केला. शिवपिंडी निघाल्याची वार्ता कळताच शेकडो लोकांनी शिवपिंडीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती.

शिवपिंड कोणत्या काळातील आहे याचा उलगडा मात्र अद्याप झालेला नाही. त्यामुळे पिंडीचा कार्यकाळ, इतिहास अजूनही अंधारात आहे. संबंधित विभागाने या ठिकाणी उत्खनन संशोधन केल्यास अनेक पैलू समोर येऊ शकतात अशी चर्चा परिसरात सुरु आहे. 

शिवपिंड निघाल्याची वार्ता समजताच आज दिनांक 26 मे ला गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी देवटोक येथे भेट देत पाहणी पाहणी करत पूजा अर्चना केली. तसेच सभामंडपा करिता 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांच्या समवेत भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, ग्रापं सदस्य राकेश गोलेपल्लीवार जिबगांव, नायब तहसीलदार सागर कांबडे, ठाणेदार शिरसाट, श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक शिर्शी चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज, उपाध्यक्ष पत्रुजी चुधरी, सचिव नरेश जकुलवार, सुरेंद्र उरकुडे, सुरज बोम्मावार, पुंडलिक पाल, नामदेव हजारे, भास्कर पोहनकार उपस्थित होते. माजी बांधकाम संतोष तंगडपल्लीवार यांनी सुद्धा कुटूंबियांसमवेत शिवपिंडीचे दर्शन घेत पूजा-अर्चना करत परिसराची पाहणी केली. 











Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top