Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गुरुवारी १७ केंद्रावर ४५ वर्षावरील नागरिकांना कोरोनाची दुसरी मात्रा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लसीकरण टोकन (ऑफलाईन) पद्धतीने केंद्रावर टोकन घेणे अनिवार्य प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन शशी ठक्कर...

  • लसीकरण टोकन (ऑफलाईन) पद्धतीने
  • केंद्रावर टोकन घेणे अनिवार्य
  • प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील
  • विनाकारण गर्दी न करण्याचे आवाहन

शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. १२ : अतिशय वेगाने संसर्ग पसरणाऱ्या कोव्हिड-१९ विषाणू सारख्या संकटाच्या काळात लस हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत गुरुवार, दि. १३ मे २०२१ रोजी शहरात एकूण १६ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. तसेच 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी ज्युबिली हायस्कूलच्या समोर एनयुएलएम ऑफिस, येथे कोव्हॅक्सिन लास उपलब्ध राहणार आहे. 

कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुरुवात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे ६० हजाराच्या आसपास लसीची पहिली व दुसरी मात्रा देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २ मेपासून १८ ते ४४ वयोगातील व्यक्तींना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १३ मे २०२१ रोजी ४५ वर्षावरील नागरिकांना लसीची दुसरी मात्र देण्यासाठी १४ लसीकरण केंद्र निर्धारित करण्यात आले आहेत. यात १. शहरी नागरी प्राथमिक आरोग्य  केंद्र १, इंदिरा नगर, मुल रोड, २. पोद्दार स्कूल, अष्ठभुजा वॉर्ड, ३. कन्नमवार प्राथमिक शाळा, सरकारनगर 

४. शकुंतला लॉन १, नागपूर रोड, ५. गजानन मंदिर, वडगांव, नागपूर रोड, ६. रवींद्रनाथ टागोर स्कूल, विठ्ठल मंदिर वार्ड,  ७. बजाज पाॅलिटेक्निक काॅलेज, बालाजी वार्ड, ८. डॉ. राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळा, भानापेठ  वॉर्ड, ९. सावित्रीबाई फुले स्कूल, नेताजी चौक बाबूपेठ, १०. राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, बाबूपेठ, ११. मुरलीधर बागला शाळा, बाबूपेठ, १२. खालसा कॉन्व्हेंट, गुरुद्वारा, महाकाली मंदिर जवळ, १३. मातोश्री स्कूल, तुकुम, १४. विद्या विहार, लॉ कॉलेज जवळ, तुकुम, १५. जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर १६. एरिया हॉस्पिटल, लालपेठ (covaxin), १७. डीइआयसी बिल्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय (covaxin) यांचा समावेश आहे. दुसरा डोस घेण्यासाठी प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी गुरुवार, दिनांक 13 मे 2021 रोजी ज्युबिली हायस्कूलच्या समोर एनयुएलएम ऑफिस, येथे कोव्हॅक्सिन लास उपलब्ध राहणार आहे

सूचना :
  • लसीकरण टोकन (ऑफलाईन) पद्धतीने होईल.
  • केंद्रावर टोकन घेणे अनिवार्य.
  • प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य राहील.
  • विनाकारण गर्दी करू नये.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top