गडचांदूर -
मुस्लिम समाजातील पवित्र सण मानल्या जाणाऱ्या रमजान ईदचे औचित्य साधत सामाजिक संवेदनशीलतेतून बिबी येथील हबीब शेख यांनी कोरोना विलागिकरण केंद्रातील रुग्णांना अंडी व सुकामेवा वाटप केले. कोव्हीड केअर सेंटर होली फँमीली गडचांदुर मधे हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी कोव्हीड सेटरच्या भोजनाची व्यवस्था सांभाळणाऱ्या आचाऱ्यांकडे ही सुकामेवा व अंडी सुपुर्द करण्यात आली. यावेळी अँड दिपक चटप, संतोष उपरे, भारत आत्राम उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते हबीब शेख यांनी मनोगत व्यक्त करताना दरवर्षी ईद निमित्ताने केला जाणाऱ्या खर्चाची बचत करून कोव्हीड केअर सेंटरला सुकामेवा व अंडी सामाजिक दायित्व म्हणून वाटप केले. कोरोना महामारीने आरोग्याचे व सदृढ आहाराचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सहकार्याच्या भावनेतून एकमेकांना मदत करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.