- ग्रामीण भागात लसीकरणाबद्दल अजूनही फारशी जनजागृती नाही
यवतमाळ (नेर) -
दि. 12 : गावखेड्यात लसीकरणाबद्दल अजूनही फारशी जागृती नाही. त्यासाठी बड्या सेलिब्रिटींना कोट्यवधी रूपये देण्यापेक्षा पिढ्यानपिढ्या दारोदार जावून परंपरागत लोकजागृतीचं काम करणाऱ्या लोककलावंतांची मदत सरकारनं घ्यावी. त्यातून हातावर पोट असणाऱ्या लोककलावंतांची लाॅकडाऊनमधली उपासमार टळेल. लोकांपर्यंत मनोरंजनातून, त्यांना भिडणारा संदेशही जाईल. वासुदेव, पांगुळ, राईंदर, बहुरूपी, नंदीबैलवाले, मसणजोगी, खेळवाले, मनकवडे, पोतराज यांच्यासह अनेक अशा लोककलावंतांनी आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम केलंय. अगदी जात्यावरच्या ओवीतूनही लसीकरणाचं महत्व जिरपायला हवं. जिथं टीव्ही, रेडिओ आणि मोबाईल पोहोचलेला नाही तिथं शेकडो वर्षापासून महाराष्ट्राची ही लोकधारा पोहचलेली आहे...
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.