- कोविड रुग्णासाठी 200 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेटर तातडीने उपलब्ध
कोविड विषाणूच्या चंद्रपूर जिल्ह्यात वाढता फैलाव लक्षात घेता कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे अहोरात्र काम करून कोरोना रुग्णांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी त्यांचा फोन म्हणजे कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी देवदूत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता आरोग्यसुविधा अपुऱ्या पडू लागले त्यामुळे वडेट्टीवार यांनी दर आठवड्यात चंद्रपूर येथे ठाण मांडून आरोग्य यंत्रणा अधिक प्रभावी व सक्षम करण्यात भर देऊन निधीची कमतरता पडू दिली नाही. शहरासह तालुक्यातील, ग्रामीणभागातील कोविड रुग्णावर वेळेवर उपचार होण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करून कोरोनावर मात करून रुग्ण बरे होण्यासाठी विविध उपाययोजना त्यांनी केल्या. कोहिड रुग्णांना त्यांचा घरून ने आण करण्यासाठी स्वतःकडून स्वखर्चाने ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही येथे मोफत रुग्णवाहिका उपलब्द करून दिले. तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लॉन्टची निर्मिती, ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा, बेडची संख्या वाढविणे, औषधीचा पुरवठा, रेमडिसिव्हर इंजेक्शन या बाबीकडे स्वतः लक्ष घालून उपलब्ध करून दिले. जिल्ह्यातील बहुतांश कोहिड सेंटरला भेट देऊन कोविड रुग्णांच्या अडीअडचणी विचारून त्या सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी केले. जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता बघता कोविड रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध होण्यासाठी 200 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर तातडीने उपलब्ध करून दिले असून त्यात ब्रम्हपुरीसाठी 30, सावलीसाठी 15, सिंदेवाहीसाठी 15, गोंडपीपरीसाठी 10, कोरपणासाठी 15, गडचांदूरसाठी 15, भद्रावतीसाठी 15, मुलसाठी 15, वरोरासाठी 15, चिमुरसाठी 10, नागभीडसाठी 10, बल्लारशाहसाठी 15, चंद्रपूरसाठी 30 अशाप्रकारे 10 लिटर क्षमतेचे 200 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्द करून दिले. ही जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बाब असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मधून राजुरा तहसिलला कां वगळण्यात आले आहे? हा भेदभाव दूर करून ब्रम्हपूरीला 15 आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर देऊन बाकीचे राजु-यिला देण्यात यावे.मा.पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी यात लक्ष घालावे.हा भेदभाव बरा नव्हे !
उत्तर द्याहटवा