Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: तपन हो का ; का हो - वाढलेल्या उन्हाने नागरिक त्रस्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - शहरातला वाढलेला उकाडा पाहता कूलरची गरज भासू लागली आहे. बहुतांश घरी कूलर सुरू झाले आहेत. तर का...


आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
शहरातला वाढलेला उकाडा पाहता कूलरची गरज भासू लागली आहे. बहुतांश घरी कूलर सुरू झाले आहेत. तर काहींनी कूलरची विक्री, दुरुस्तीचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर कूलर अत्यावश्यक सेवेमध्ये यायला हवेत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

'ब्रेक द चेन' अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कूलरची दुकाने बंद आहेत. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. नागपुरातील वाढलेल्या तापमानाने घामाच्या धारांना आमंत्रण देऊ लागले आहे. साधा पंखा लावून रात्री झोपणे कठीण होऊन बसले आहे. दुपारीसुद्धा पंख्याने काहीच फरक पडत नसल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत कूलरची गरज भासू लागली आहे. पुढील काही दिवसांत विशेषत: एप्रिल महिन्याच्या पंधरा तारखेनंतर उन अधिक असणार आहे. सरकारचे निर्बंध ३० एप्रिलपर्यंत असल्याने याकाळात उष्माघाताने वृद्ध तसेच कमकुवत रोगप्रतिकारक्षमता असलेल्यांचा मृत्यू होण्याची भीती आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाळ्यात लागणारे कूलर ही बाब चैनीची नसून अत्यावश्यक होऊन बसल्याची भावना नागरिक व्यक्त करू लागले आहेत.

अपेक्षांवर फेरले पाणी
कॉटन मार्केटमध्ये मध्य भारतातील सर्वांत मोठी कूलरची बाजारपेठ आहे. याच बाजारपेठेतून राज्यासह छत्तीसगड, रायपूर, राजस्थानला कूलरचा पुरवठा होतो. विदर्भात कूलरचे पन्नासहून अधिक छोटे-मोठे कारखाने आहेत, तर शहरात पाचशेच्यावर व्यापारी आहेत. सर्व कूलरची निर्मिती कारखान्यात होते. सध्याच्या निर्बंधांमुहे हे मार्केट पूर्णत: थंडावले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या चार महिन्यांत जवळपास १५ कोटींहून अधिकची उलाढाल नागपूरच्या बाजारपेठेत होते. मागील वर्षापासून सिमेंटच्या रस्त्यांमुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. त्याचा फायदा बाजारपेठेला होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु, आता या अपेक्षांवर पुरते पाणी फेरले आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top