- केळझर येथील घटना, शेतकऱ्यांचे नुकसान
- तीन बैल व एका गाईचा मृत्यू
राजुरा तालुक्यातील केळझर येथे नाल्यावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन जनावरांना अचानक जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत देवराव भोंगळे यांच्या मालकीचा एक बैल,बालाजी टोंगे यांची एक गाय तर प्रभाकर मडावी यांच्या मालकीचा एक बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांचे जवळपास १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.वातावरणात बदल झाल्याने शनिवारी सायं. अचानक वादळाला सुरुवात झाली. त्यामुळे वीज खांबावरील जिवंत वीज तारा तुटून खाली पडल्या. रविवारी केळझर येथील जनावरे पाणी पिण्यासाठी गेले असता तीन जनावरांना पडून असलेल्या जिवंत वीज तारांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेत शेतात कसणारे दोन बैल व एक दुभती गाय मरण पावल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.