- आमदार किशोर जोरगेवार यांच्या विकास निधीतून 1 कोटींचे साकारणार कोविड रूग्णालय
- कोरोना रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी अत्याधुनिक कोविड रुग्णालय उभारण्याच्या केल्या सुचना
चंद्रपूरात कोरोनाचा उद्रेेक सुरु आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने प्रशासनाला योग्य मार्गदर्शक सुचना केल्या जात आहे. त्यांच्या निर्देशानंतर आयुर्वेदीक रुग्णालयही कोविड करिता सुरु करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. तसेच नुकतीच त्यांनी रामनगर चैकातील शासकीय वैद्यकीय महाविदयालयाला भेट देत येथील 30 खाटा कोरोना रुग्णांसाठी सुरु केल्या आहे.
एकंदरीतच जिल्हा प्रशासन कोरोनावर मात मिळविण्यासाठी युध्द स्तरावर काम करत आहे. मात्र यात मनपा प्रशासनाचेही मोलाचे योगदान असणे गरजेचे असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. कोरोना काळात मनपा प्रशासनाकडून अपेक्षीत अशी कोणतीही उपायोजना करण्यात आलेली नाही. परिणामी महानगर पालिका हद्दीत कोरोनाचा अधिक उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 1 कोटी रुपयांचा निधी कोविड रुग्णालय उभारण्यासाठी मनपा प्रशासनाला दिला.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार निधीतील 1 कोटी रुपये कोरोनावर खर्च करण्यासाठी परवाणगी दिली आहे. त्यांनतर हे संपूर्ण 1 कोटी रुपये आमदार किशोर जोरगेवार यांनी 100 खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी मनपाला हस्तांतरीत केले आहे. या निधीतून सर्व सोयी सुविधांनी सज्ज असे अत्याधूनिक कोविड रुग्णालय तयार करुन येथे आक्सिजन, वेंटीलेटर, अत्यावश्यक औषधी उपलब्ध करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त यांना केल्या आहे. मनपा आयुक्तांनीही यावर लवकर कार्यवाही करत मनपाच्या रैन बसेरा येथे हे रुग्णालय तात्काळ सुरु करण्याचे आश्वस्त केले आहे. मनपाकडे रुग्णायल सुरु करण्यासाठी इमारत आहे. त्यातच त्यांच्याकडे स्वताची स्वतंत्र आरोग्य व्यवस्थाही आहे. कोरोना रुग्णालयासाठी या जमेच्या बाजू असून सदर निधीचा योग्य उपयोग करुन महानगर पालिकेने लवकर कोविड रुग्णालय सुरु करावे अशी आशा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.