- खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा एकदा गाव बंदी मोहीम
राजुरा -
कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधितां करिता रुग्णालय, बेड, प्राणवायू व औषधा चा तुटवळा होत असल्याने नागरिकांना मध्ये कोरोना संसर्गाची भीती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता राजुरा तालुक्यातील बाबापूर वासीयांनी गाव बंदी मोहीम आखली आहे.
लगतच्या गावातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या पाहता तसेच गोवरी, पोवनी, साखरी, पेल्लोरा, माथरा ह्या गावात वाढता संक्रमण पाहता बाबापूर येथील ग्रामस्थांनी बाहेरील गावकऱ्यांकरिता गावात प्रवेश वर्जित केला आहे.
दुसऱ्या गावातून येणाऱ्या लोकांना बाबापुरग्रामस्थांनी बंदी लावल्याने कोरोना संसर्गाला आळा बसेल व गावात कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होणार नाही ह्या ध्येया पोटी गाव बंदी मोहीम आखण्यात आल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
लगतच्या गोवरी, पोवनी गावात मागील काही दिवसात ७० हुन अधिक कोरोना बाधितांची नोंद झाल्यामुळे बाबापूर, मानोली, कढोली, चार्ली, नीर्ली, कोलगाव वासीयांन मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.