Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोलारी गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहील - आ. बंटीभाऊ भांगडीया
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोलारी येथील सभागृह लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी चिमूर - चिमूर विधानसभा क्षेत्रात संत एकनाथ महारा...

  • कोलारी येथील सभागृह लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चिमूर -
चिमूर विधानसभा क्षेत्रात संत एकनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोलारी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहील, असे प्रतिपादन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी कोलारी येथे केले ते कोलारी येथील गुरुदेव सभागृह  व संत एकनाथ महाराज देवस्थान  येथे सांस्कृतिक सभागृह बांधकाम लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी कोलारी येथे सार्वजनिक स्वचालय साठी ५ लक्ष रुपये निधी मंजूर करून देण्याचा विश्वास गावकरी मंडळींना दिला व गावांतील अंतर्गत नाली बांधकाम करण्यास ५ लक्ष रुपये स्थानीक विकास निधी अंतर्गत उपलब्ध करून देण्याचा विश्वास दिला.प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावा व कोरोनाच्या महामारीला आळा घालण्यास मदत करावी अशी विनंती देखील गावकरी लोकांना केली.

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी आपल्या स्थानीक विकास निधी मधून एकनाथ महाराज देवस्थान कोलारी येथे २५ लक्ष रुपये मंजूर करून संस्कृती सभागृह बांधकाम पूर्ण करून दिले त्याचप्रमाणे १५ लक्ष रुपये किमतीचे गुरुदेव सेवा मंडळ बांधकाम पूर्ण करून दिले व हनुमान मंदिर जवळ ६ लक्ष रुपये किमतीचे सभागृह बांधकामाचे भूमिपूजन केले त्यामुके गावकरी लोकांनी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचा ग्रामगीता देऊन भव्य सत्कार केला.

या वेळीभाजपा जेष्ठ नेते बकारामजी  मालोदे श्री राजुभाऊ देवतळे,श्री रमेशजी कंचरलावार, श्री अविभाऊ बरोकर,अनिलजी शेंडे श्री सूरज नरुले,संजय खाटीक, श्री विवेक कापसे,चिचाळा (शास्त्री) येथील सरपंच अरविंद राऊत कोलारी येथील उपसरपंच सौ.दीप्ती बोकडे,कमिटी सचिव चिंतेश्वर पाटील चौधरी,तंटामुक्ती अध्यक्ष डोमाजी बोकडे, मधूकरजी गावंडे,माजी सरपंच कोलारी प्रजवलाताई गावंडे,श्री परसरामजी ठाकरे, साठगाव येथील सरपंच सौ.प्रीती दिडमुठे, श्री दुर्योधन जी लाखे डॉ.अलोने, निलेश अलोने, सपना काटेकर,सौ वर्षा शेंडे, व गावकरी व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अलोने यांनी केले तर प्रास्ताविक उपसरपंच सौ दिप्ती बोकडे यांनी केले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top