- बल्लारपूर नगर परिषदेतर्फे इमारत बांधकामाचे भूमीपूजन संपन्न
दिनांक ३० मार्च रोजी बल्लारपूर नगर परिषदेच्या माध्यमातुन आयोजित इमारत बांधकामाच्या भूमीपूजन सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मंजूर विकास आराखडयातील आरक्षण क्रमांक ४१ शॉपींग सेंटर सर्वसमावेशक आरक्षण तत्वानुसार विकसित करून नगर परिषदेला हस्तांतरीत करावयाच्या इमारतीचा भूमीपूजन सोहळा संपन्न झाला. या सोहळयाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा सौ. मिना चौधरी, सौ. रेणुका दुधे, मुख्याधिकारी विजय सरनाईक, घनश्याम मुलचंदानी, अजय दुबे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, समीर केने, मनीष पांडे, निलेश खरबडे, आशिष देवतळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, बल्लारपूर शहरात विकासकामांची दिर्घमालिका आम्ही तयार केली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मीती, तहसिल कार्यालय इमारतीचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बस स्थानक, राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्मार्ट पोलिस स्टेशन, छठपूजा घाट, मुख्य मार्गांचे सिमेंटीकरण, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मीती, अत्याधुनिक भाजी मार्केट, ई-वाचनालये, चार बालोद्याने अशी विविध विकासकामे आम्ही पूर्णत्वास आणली. शहरानजिक देशातील अत्याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून सर्व आवश्यक क्रिडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रिडा संकुल देखील पूर्णत्वास आले आहे. विकासकामांच्या या दिर्घ मालिकेच्या माध्यमातुन बल्लारपूर शहर बदलत गेले आहे. या पुढील काळातही विकासाची ही मालिका अशीच अव्याहतपणे सुरू राहणार असल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन काशी सिंह यांनी केले तर नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी आभार व्यक्त केले. आ. सुधीर मुनगंटीवार यांची विकासाबद्दलची कल्पकता व तळमळ ही आमच्यासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे. यातुनच या शहराचा विकास साधला गेला असून भविष्यातही या शहराच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगून आम्ही कार्यरत राहू, असेही हरीश शर्मा म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.